कोरोनावर नियंत्रण मिळवणं आता शक्य नाही? सरकार अपयशी ठरल्याचा नॅशनल टास्क फोर्सचा दावा

साम टीव्ही
सोमवार, 1 जून 2020
  • भारतात अनेक भागात कम्युनिटी ट्रांसमिशनचा धोका?
  • सरकार अपयशी ठरल्याचा नॅशनल टास्क फोर्सचा दावा
  • कोरोनावर नियंत्रण मिळवणं आता शक्य नाही ?

भारतात आता कोरोनाचा वेगानं प्रसार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आलीय. कोरोनाशी लढण्याकरता तयार करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सकडून ही भीती व्यक्त करण्यात आलीय.

देशात लॉकडाऊन ५ किंवा अनलॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरु झालाय. मात्र कोरोना अभ्यासक, तज्ज्ञ, डॉक्टर्स.. इतकंच काय तर कोरोनाशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सनंही तीव्र नाराजी व्यक्त केलीय. अनलॉकडाऊनमुळे देशाच्या काही भागांपुरतं मर्यादित समूह संक्रमण आता प्रत्येक भागात पसरेल आणि कोरोना संक्रमणाचा विस्फोट होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. नॅशनल टास्कर फोर्सच्या टीमनं पंतप्रधान मोदींना यासंबंधी पत्र लिहिल्याची माहिती मिळतेय. 

जेव्हा भारतात कोरोना संक्रमणाचा वेग कमी होता, तेव्हाच मजुरांना घरी पाठवण्याची परवानगी द्यायला हवी होती. शहरांमधून आता कोरोनाबाधित मजूर गावागावात पोहचत आहेत. त्यामुळे काही भागांपुरतं मर्यादित असलेलं समूह संक्रमण आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकतं, अशी भीती व्यक्त केली जातेय. पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये दिलेल्या सवलतींवरुन नाराजी व्यक्त होतेय. याची तात्काळ दखल सरकारनं घेणं आवश्यक आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live