मोदींच्या राज्यात हिंदूंच्या देवांनाही धोका - सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 मार्च 2020

भाजप व संलग्न संघटनांकडून देशात ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी ‘हिंदू खतरें में’ असे सांगितले जात असताना मोदींच्या राज्यात हिंदूच नव्हे, तर हिंदूंचे देवही खतरे में, अशी टीका कॉंग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केली.

मुंबई - भाजप व संलग्न संघटनांकडून देशात ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी ‘हिंदू खतरें में’ असे सांगितले जात असताना मोदींच्या राज्यात हिंदूच नव्हे, तर हिंदूंचे देवही खतरे में, अशी टीका कॉंग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केली.  

हे पण पाहा : Special Report | शेतकऱ्याचं अवकाळीमुळे लाखांचं नुकसान, बळीराजा हवालदिल

बॅंकांमध्ये असणारा पैसा हा बहुसंख्य हिंदूंचाच असून तो सुरक्षित राहिलेला तर नाहीच; पण अनेक कुटुंबेही उद्‍ध्वस्त झाली आहेत. त्याला मोदी सरकारच जबाबदार आहे. पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये असलेले ५४५ कोटी रुपये एका महिन्याआधी याच बॅंकेत जमा करण्यात आले होते, तेही आता बुडाले आहेत. भगवानही संकटात आल्याचे सावंत म्हणाले.

मोदी-शहांना गुजरातची काळजी

बडोदा महापालिकेच्या स्मार्ट डेव्हलपमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये येस बॅंकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवसाआधीच काढून घेण्यात आले. यातून मोदी-शहा यांना फक्त गुजरातचीच काळजी असते हे दिसून आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ९०५ कोटी येस बॅंकेत आहेत. तेथे भाजपची सत्ता आहे. मोदी-शहांनी किमान या महापालिकेच्या कानात जरी सांगितले असते, तरी ते या संकटातून वाचले असते, असे सावंत म्हणाले.

Web Title: The danger to the gods of Hindus in the Modi state also sachin sawant


संबंधित बातम्या

Saam TV Live