VIDEO| मांजरीसाठी आजीनं नातीचा जीव घातला धोक्यात

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
शनिवार, 11 जानेवारी 2020

मांजरीला वाचवण्यासाठी नातीचा जीव धोक्यात घातला... हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. एका ठिकाणी मांजर फसलं होतं...त्याला बाहेर यायला जमत नसल्यानं जोरजोरात आवाज करत होतं...त्यामुळं या मांजरीला वाचवण्यासाठी काहीच पर्याय नसल्यानं आजीनं आपल्या 7 वर्षांच्या नातीला दोरीनं बांधून खाली सोडण्याचं धाडस केलं.. पाचव्या मजल्यावर ही महिला राहते...आणि हे मांजर तिसऱ्या मजल्यावर अडकलंय...त्यामुळं या महिलेनं आपल्या नातीला दोरीला बांधलं आणि खाली सोडलं... किती भयानक प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय...मांजर अडकलं होतं तर फायरब्रिगेडला बोलावलं असतं...पण, तेवढाही वेळ न दवडता या महिलेनं नातीला खाली सोडलं...

रस्सी सुटली असती तर काय झालं असतं याचा विचार न केलेलाच बरा...तरीदेखील या महिलेनं धाडस करत मांजराचा जीव वाचवण्यासाठी नातीचा जीव टांगणीला लावला...आणि या मांजरीचा जीव वाचवला.. जवळपास 10 मिनीटं हा थरार सुरू होता...अखेर मांजरीला वाचवल्यानंतर नातीला वर ओढण्यासाठी लोकांना बोलावलं...पण, असं धाडस करणं योग्य नसल्याची चर्चा सोशल मीडियावर होतेय...हा धक्कादायक प्रकार चीनच्या सिचुआन प्रांतामध्ये घडलाय...

WebTittle: The danger of putting your grandchildren in danger for a cat


 

संबंधित बातम्या

Saam TV Live