युरोप, अमेरिकेत कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेचा धोका

युरोप, अमेरिकेत कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेचा धोका


'युरोप आणि अमेरिकेत 'लॉकडाउन' शिथिल केल्यामुळे करोना संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते, ती आवरणे कठीण जाईल,' असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

अमेरिकेतील अनेक राज्यांनी 'लॉकडाउन' निर्बंध शिथिल केले असून, तेथे नित्याचे व्यवहार सुरू झाले आहेत. युरोपमध्ये 'लॉकडाउन' शिथिल करण्यात आलेले नाही. जर्मनीने दुसऱ्या संभाव्य लाटेसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. रुग्ण आणि त्यांच्या सहवासातील व्यक्ती शोधण्याचा वेग वाढविण्याची सूचना इटलीतील तज्ज्ञांनी केली आहे. फ्रान्सनेही दुसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे.'निर्बंध शिथिल करून आपण मोठा धोका पत्करत आहोत. ते आवरणे कठीण आहे,' असे कोलंबिया विद्यापीठातील सेंटर फॉर इन्फेक्शन अँड इम्युनिटीमधील डॉ. इयान लिपकिन यांनी दिला आहे. दुसरी लाट येऊ शकते; पण ती किती चिंताजनक असेल? आताच काही सांगणे घाईचे ठरेल, असे फ्रान्सच्या पाश्चर विद्यापीठातील विषाणू विज्ञान विभागाचे प्रमुख ऑलिव्हर श्वार्ट्झ यांनी म्हटले आहे.


WebTittle ::  Danger of the second wave of corona in Europe, America

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com