कोव्हॅक्सिनची तारीख ठरली?

साम टीव्ही
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

देशात तयार होणारी कोरोना लस कधीपर्यंत येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचलीय. भारत बायोटेकनं यासंबंधीचं नियोजन सुरु केलंय

देशात तयार होणारी कोरोना लस कधीपर्यंत येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचलीय. भारत बायोटेकनं यासंबंधीचं नियोजन सुरु केलंय.

पहा या संदर्भातील महत्वाचा व्हिडीओ-

 

अवघ्या जगाचं लक्ष कोरोना लसीकडे लागलंय. भारत बायोटेककडून भारतात कोव्हॅक्सिन या लसीवर संशोधन सुरु आहे. ही लस पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत अर्थात एप्रिल ते जून या कालावधीदरम्यान येईल अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलीय. भारतीय रेग्युलेटरी ऑथोरिटीजनं सर्व परवानग्या वेळेत दिल्या तर ही लस एप्रिलपर्यंत येईल, असं सांगण्यात येतंय. 

भारत बायोटेकनं ही लस ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीसह एकत्र येत तयार केलीय. कोव्हॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशभरात सुरु आहे. आशा करुयात की लवकरात लवकर ही लस येईल आणि देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live