मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तारखा जाहीर, असा असेल परिक्षांचा पॅटर्न

साम टीव्ही
बुधवार, 9 सप्टेंबर 2020
  • मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तारखा जाहीर
  • 1 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा
  • विद्यापीठाने घालून दिलेल्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा
  • सर्व विषयांच्या थेअरी परीक्षा 50 गुणांच्या असणार

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जाहीर केलंय. पदवी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर दरम्यान घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतलाय.

पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठाने दिला असून संलग्न महाविद्यालयांनी त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत. या कालावधीत तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून MCQ पद्धतीने होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील.

कामाची बातमी | उद्यापासून लागू होणार नवे कर्जदर, भविष्यात RBIकडून आणखी व्याजदर कपातीची शक्यता

दरम्यान, 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्यात येणारय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्यान मंत्रालयाने मंगळवारी 9वी ते 12वीपर्यंत अंशतः शाळा सुरू करण्यासंदर्भात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर जारी केलीय. यामुळे आता 21 सप्टेंबरपासून शाळां सुरू व्हायला सुरुवात होईल. मात्र, विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळेत येण्याची परवानगी द्यावी लागेल. म्हणजेच शाळेत येणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार नाहीय. तसचं कंटेनमेंट झोन बाहेर असलेल्या शांळाच सुरू करण्याची परवानगी असेल. कंटेनमेंट झोनमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनाही शाळेत येण्याची परवानगी नसेल.  शाळांना शाळांमध्ये शिकविण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य देण्यात आलंय. क्लास वेग-वेगळ्या टाईम स्लॉटमध्ये चालतील आणि कोरोनाचे लक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार नाहीत.
याशिवाय वेळोवेळी हात धुणे, फेस कव्हर लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live