वृद्धापकाळाने मृत्यू झालेल्या सासुवर सुनेकडून अंत्यसंस्कार

रुपेश पाटील
गुरुवार, 22 एप्रिल 2021

वयाची शंभरी पार केलेल्या मयत सासूच्या मृतदेह सुनेने अग्नी दिला. हा विषय सध्या पालघर मध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

पालघर - वयाची शंभरी पार केलेल्या मयत सासूच्या मृतदेह सुनेने अग्नी दिला. हा विषय सध्या पालघर Palghar मध्ये चर्चेचा विषय बनला आहे. मनोर Manor जवळच असलेल्या दहिसर Dahisar या गावातील ताराबाई गोडांबे या वयाची शंभरी पार केलेल्या महिला होत्या. वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला. Daugher in law performed last rites of mother in law

शासनाने Government लागू केलेल्या निर्बंधांमुळे Restrictions ताराबाई यांचे कुटुंबीय त्यांचा अंत्यसंस्कारच्या वेळी मात्र हजर राहू शकले नाहीत. ताराबाई यांचे पती आणि मुलगा यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. Daugher in law performed last rites of mother in law

ताराबाई यांचा सांभाळ त्यांच्या सूनबाई नीता गोडांबे ह्या करीत होत्या. मात्र ताराबाई यांचा काल वृद्धापकाळाने मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा Corona प्रादुर्भाव वाढत असल्याने अंत्ययात्रेस ठराविक जण उपस्थित होते.  त्यामुळे ताराबाई यांच्या सून नीता गोडांबे यांनी आपल्या सासूच्या मृतदेहाला अग्नी देऊन त्यांचे अंत्यसंस्कार Funeral केले.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live