ढिण्चॅक पूजा लक्षात आहे ना? तिचं नवं गाणं आलंय, कोरोनोची जनजागृती करणारं

सिद्धेश सावंत
शुक्रवार, 20 मार्च 2020

मुंबई - कोरोनाची आता जशी सगळ्यांनी धास्ती घेतली आहे, अशी धास्ती काही वर्षांपूर्वी एका नवोदित गायिकेची घेण्यात आली होती. नाव होतं ढिण्चॅक पूजा (Dhinchak Pooja). आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे ही गायिका चर्चेत आली. सेल्फी मैने ले लिया फेम ढिण्चॅक पूजावर अनेकप्रकारे टीकाही करण्यात आली होती. मात्र तिच्या यू ट्यूब चॅनेल अल्पावधीत मोठं नाव कमावलं होतं.

अशा या ढिण्चॅक पूजाचं नवं गाणं आलं आहे. या गाण्यात तिने कोरोनाची जगजागृती केली आहे. तिच्या या गाण्याची सध्या सोशल मीडियात तुफान चर्चा आहे. कोरोनाची लक्षणं दिसली तर काय करायचं, हे सांगण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आलेला आहे.

पाहा ढिण्चॅक पूजाचं हे गाणं -

दरम्यान, त्रिवेंद्रममध्ये तर पोलिसांनी चक्क नाचून कोरोनाबाबत जनजागृती केली होती. नाचत हात कसे धुवायचे, सॅनिटायजरने हात स्वच्छ कसे करायचे, याचा डेमोच पोलिसांनी दिलेला होता. 

पाहा व्हिडीओ - 

सध्या देशात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मात्र अशा गंभीर परिस्थितीही अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यासाठी लोकांनी आपल्या क्रिएटीव्हीटीचा कस पणाला लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्वच्छ राहा, काळजी घ्या आणि खबरदारी घ्या. कारण एकवेळ कोरोना वायरस निघून जाईल, पण लोकांची क्रिएटीव्हीटी काही कमी होणार नाही, हे नक्की.

cororna virsu covid 19 pooja international entertainment marathi maharashtra police song viral social india

संबंधित बातम्या

Saam TV Live