महिलेचा मृतदेह चक्क दोन दिवस पडून...चंद्रपुरातील धक्कादायक घटना

संजय तुमराम
सोमवार, 5 एप्रिल 2021

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचा मृतदेह तब्बल दोन दिवस बेवारस स्थितीत पडून राहिल्याचे उघडकीला आले आहे

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचा मृतदेह तब्बल दोन दिवस बेवारस स्थितीत पडून राहिल्याचे उघड झाले आहे. उपचारासाठी तिला तीन दिवसांपूर्वी इथं दाखल करण्यात आले होते, पण तिला बेड उपलब्ध नसल्याने, उपचार मिळाले नाहीत. महिला वार्डच्या आवारात तिला ठेवण्यात आले होते. Dead Body of Women Laying for two days without Attention in Chandrapur

दाखल झाल्यापासून एकही डॉक्टर (Doctor) तिच्याकडे फिरकलासुद्धा नाही. तिला कोणता आजार होता, ती कशामुळं मरण पावली, याचा कोणताही तपशील नाही. शनिवारी (Saturday) तिचा मृत्यू झाला. तरीही तिचा मृतदेह उचलला गेला नाही. तिच्या बाजूला लागून असलेल्या महिला रुग्ण कक्षात अनेक महिला भरती आहेत. त्यांच्यासमोर हा मृतदेह दोन दिवस पडून राहिला होता . Shocking type of hospital in Chandrapur 

माध्यमांच्या प्रतिनिधींनी (Media) इथं भेट दिली, तेव्हा रुग्णालय व्यवस्थापन विभागाने या महिलेचा मृतदेह उचलला. ऐन कोरोना (Corona) काळात शासकीय रुग्णालयाची ही उदासीनता आणि अनागोंदी रुग्णांना धडकी भरवणारी गोष्ट ठरली आहे. एकीकडे उत्तम आरोग्य सेवेचे गोडवे गायले जात असतानाच उजेडात आलेली ही घटना आरोग्यसेवेची पोलखोल करणारी ठरली आहे. रुग्णालयातील घाणेरडे स्वच्छतागृह, कचऱ्याचे साम्राज्य रुग्णालयाचा गलथानपणा समोर येत आहे. आता या प्रकारावर रुग्णालय व्यवस्थापन मूग गिळून गप्प आहे. Dead Body of Women Laying for two days without Attention in Chandrapur

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त हे रुग्णालय आहे. डीन हे या हॉस्पिटलचे प्रमुख आहेत, पण ते नेहमीच बघ्याची भूमिका घेत आले आहेत, आणि याही प्रकरणात ते बोलायला तयार नाहीत. तथापि, या प्रकारामुळं रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला संतापलेल्या असून, हा आमच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Shocking type of hospital in Chandrapur 

Edited By - Digambar Jadhav.


संबंधित बातम्या

Saam TV Live