टोमॅटोवर जीवघेणा विषाणू? वाचा काय आहे सत्य...

साम टीव्ही
शनिवार, 16 मे 2020
  • टोमॅटोवर जीवघेणा विषाणू पसरल्याची अफवा
  • कोरोनाच्या संकटात अफवांनी बळीराजा चिंतेत
  • अफवा थांबवा, बळीराजाला वाचवा

टोमॅटो पिकाबद्दल एक अफवा पसरवली जातेय. ज्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आलेत. नेमका काय आहे, हा सगळा प्रकार? या सविस्तर रिपोर्टच्या माध्यमातून समजून घेऊयात आणि शेतकऱ्याला या संकटातून वाचवू यात.

 आधीच लोक कोरोनामुळे धास्तावलेत. एका व्हायरसनं इतके दिवस लोकांचं जगणं मुश्कील करुन सोडलंय.. अशात आता अफवा संकटांचा नवा डोंगर रचतायत. टोमॅटोवर असलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून अफवा 

पसरवल्या जात आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. 

टोमॅटोवर जरी हा विषाणू असला तरी आपल्याला त्याचा धोका का नाहीये. हे समजून घेऊ.

 अफवा थांबवा, बळीराजाला वाचवा

  • वनस्पती बाधक विषाणू आणि प्राणी बाधक विषाणू या वेगळ्या प्रजाती आहेत
  • पिकांचं नुकसान करणाऱे विषाणू माणसाला आजारी पाडू शकत नाहीत 
  • टोमॅटोवरील विषाणूमुळे कुणीही आजारी पडल्याची माहिती नाही
  • भारतात काय, जगभरात अशी घटना घडलेली नाही 
  • अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायद्याने गुन्हा आहे
  • आधीच विषाणूजन्य आजाराने टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यातही जे पिक उरलंय. ते असल्या अफवांमुळे विकलं जाणार नाही. याची भीती शेतकऱ्यांना सतावतेय. याचं भान ठेवून तरी आपण सगळ्यांनी असल्या अफवांपासून चार हात लांब राहायला हवं. बळीराजाला वाचवायला हवं...


संबंधित बातम्या

Saam TV Live