रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे मृत्यू; सहकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने वाहिली श्रद्धांजली 

ambulance news
ambulance news

अमरावती - शहरातील एका ऍम्ब्युलन्स चालकाचा ambulance driver कोरोनामुळे Corona  मृत्यू झाला.त्याच्या सहकारी ऍम्ब्युलन्स Cooperative ambulance चालकांनी मृतदेह Death Body स्मशानभूमीत नेत असताना जवळपास १५ ते २० ऍम्ब्युलन्स अंत्ययात्रेत सामील करून आपल्या सहकाऱ्याला अंतिम विदाई देत Tribute श्रद्धांजली दिली. मात्र अशा प्रकारे सायरन वाजवत निघालेल्या या ऍम्ब्युलन्स पाहून शहरातील नागरिकांना People चांगलीच धडकी भरली आणि वेगवेगळ्या चर्चाना ऊत आला. एकाच वेळी इतके मृतदेह अंतिम संस्कारासाठी आले कि काय ? या विचाराने प्रत्येक जण घाबरून गेल्याच चित्र स्मशानभूमी Cemetery परिसरात पाहायला मिळालं. Death of ambulance driver due to corona

संजय किसनराव कुणते (वय ५०) या खाजगी संस्थेच्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनामुळे बुधवारी पहाटे मृत्यू झाला.त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाली असताना त्याच्या सहकारी रुग्णवाहिका चालकांनी त्यांच्या अंत्ययात्रेत रुग्णवाहिका नेऊन सहभाग घेतला.आपल्या सहकाऱ्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होताना अनेक रुग्णवाहिका चलक सायरन वाजवत निघाल्याने अमरावतीकरांमध्ये दहशत निर्माण झाली.

हे देखील पहा -

अमरावती शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने आज बऱ्याच रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाल्या.त्यामुळे, अमरावतीकरांच्या मनात धडकी भरली. जिल्हा समान्य रुग्णालय येथील शव विच्छेदनगृह जवळून सायरन वाजत 15 ते 20 रुग्णवाहिका हिंदू स्मशानभूमीकडे निघाल्या. सायरनचा जोरदार आवाज करीत या रुग्णवाहिका रेल्वे स्थानक चौक, राजकमल चौक, गांधी चौक, भूतवश्वर चौक येथून हिंदू स्मशानभूमी कडे निघाल्या. Death of ambulance driver due to corona

इतक्या रुग्णवाहिका निघाल्याचे पाहून नागरिक चांगले धास्तावले.रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना सायरन वाजवणे बेकायदेशीर असताना ऐन कोरोनाकाळात सायरन वाजवत 15 ते 20 रुग्णवाहिका स्मशानभूमीकडे निघाल्याने खळबळ उडाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com