धक्कादायक ! अंत्यविधी केलेला मृतदेह काढला बाहेर

Saam Banner Template (2)
Saam Banner Template (2)

लातूर - येथील वैद्यकीय महाविद्यालयातील गलथान कारभारामुळे मृतदेहाची Death body आदलाबदल Exchange झाल्यानंतर चाकूर Chakur तालुक्यातील शेळगाव Shelgaon येथे अंत्यविधी करण्यात आलेला मृतदेह जमिनीतून उकरून काढण्यात आला व त्यांच्या नातेवाईकांकडे स्वाधीन करण्यात आल्याची घटना घडली आहे. death bodies of patient exchange in latur

शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे (वय ६५) यांना मागील आठवड्यात कोरोना Corona झाल्यामुळे त्यांच्यावर उदगीर  Udgir येथे उपचार करून लातूर येथील कै. विलासराव देशमुख Vilasrao Deshmukh वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी (ता.५) सायंकाळी त्यांचा मृत्यु झाल्यानंतर नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावाकडे आणला व त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार केले.

हे देखील पहा -

याच दरम्यान हातोला (ता.अंबाजोगाई) येथील आबासाहेब सखाराम चव्हाण (वय ४५) यांचाही मृत्यु झालेला होता. वैद्यकीय महाविद्यालयातील गलथान कारभारामुळे शेळगावच्या तोंडारे यांच्या नातेवाईकांकडे चव्हाण यांचा मृतदेह देण्यात आला, मृतदेहाची खात्री कोणीही न करता त्यांच्यावर अंत्यंसस्कार करण्यात आले. सकाळी चव्हाण यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली.death bodies of patient exchange in latur

यानंतर नातेवाईकांनी तोंडारे यांचा मृतदेह सोबत घेऊन शेळगाव येथे आले व त्यांनी तोंडारे यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून चव्हाण यांचा पुरलेला मृतदेह काढून घेतला व गावाकडे घेऊन गेले. यानंतर तोंडारे यांच्या मृत्यदेहावर अत्यंसंस्कार करण्यात आला. कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णावर लातूर महानगर पालिके कडून अंत्यसंस्कार केले जात असतानाही अनेक मृतदेह स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता गावाकडे अंत्यविधीसाठी आणले जात आहेत. महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com