अंगाला हळद लागण्या अगोदरच तरुणावर काळाचा घाला

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 5 मार्च 2020

पुणे : सिंहगडरोड परिसरातील नर्‍हे सर्व्हिस रस्त्यावर नवले पुल चौकाजवळ डंपरची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात विराज प्रताप निकम (वय 28,रा. मानव मंदीर सोसायटी, धनकवडी) या हॉटेल व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी प्रितेश प्रविण शहा (वय 23, रा. गुलाब नगर ,धनकवडी) हा गंभीर जखमी झाला असून, रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. सर्वात दुर्देवी प्रकार म्हणजे निकम याचा 19 मार्चला विवाह होणार होता. या घटनेमुळे परसिरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डस्ट भरलेला डंपर (एमएच12, एच बी 1555) हा नर्‍हे बाजूने जात असताना ऍक्टिवा (एमएच 12, पीव्ही 9484) या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. यामध्ये विराज निकम हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अपघातात विराजच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. तर प्रीतेश याचा पाय फॅक्चर झाला आहे. विराजने हॉटेल व्यावस्थापनाचा अभ्यासक्रम पुर्ण केला असून त्याच्या घराच्यांचा कंपन्यांना फळभाज्या पुरविण्याबरोबरच हॉटेलचा व्यवसाय आहे. विराजचे लग्न 19 मार्च रोजी होणार होते. लग्नाअगोदारच काळाने त्याच्यावर झडप घातली. हाताला आलेला कर्ता मुलगा गेल्याने संपुर्ण कुटुंब हवालदिल झाल्याची माहिती येथील नागरिकांनी सांगितली. त्याच्या पश्चात आई, वडील व धाकटा भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

WEB TITL- Death before marriage

संबंधित बातम्या

Saam TV Live