बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यु तांडव.....

संजय जाधव
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोरोना विरुद्धच्या आरपारच्या व अमर्यादित लढाईमध्ये मागील मार्च  महिना सर्वात भीषण व जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांची कठोर सत्व परीक्षा घेणारा ठरलाय! मार्च २०२१ मध्ये बुलडाणा Buldana जिल्ह्यात  कोरोनाने Corona रेकॉर्डब्रेक ७६ बळी Deaths घेतले आहेत.

बुलडाणा : कोरोना विरुद्धच्या आरपारच्या व अमर्यादित लढाईमध्ये मागील मार्च  महिना सर्वात भीषण व जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांची कठोर सत्व परीक्षा घेणारा ठरलाय! मार्च २०२१ मध्ये बुलडाणा Buldana जिल्ह्यात  कोरोनाने Corona रेकॉर्डब्रेक ७६ बळी Deaths घेतले आहेत. यावर कळस म्हणजे गत वर्षभरात मिळून १५४ मृत्यू झाले असताना चालू वर्षातील साडेतीन महिन्यांतच कोविडने १६२ बळी घेतल्याचे धक्कादायक माहिती आहे. Death Rate in Buldana due to Corona is scary

कोरोनाची दुसरी लाट Corona Second Wave पहिलीपेक्षा कितीतरी भयंकर आहे. कोरोना बाधितांची टक्केवारी, दैनंदिन रुग्ण संख्या, मृत्यूचे प्रमाण, वेगाने होणारा फैलाव, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत कोविडने मारलेली मुसंडी सर्वच भीतीदायक व धक्कादायक आहे. गत् वर्षी मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात पहिल्या बळीची नोंद झाली. मे २०२० मध्ये २, जूनमध्ये ९ तर जुलै व ऑगस्टमध्ये प्रत्येकी १८ मृत्यूंची नोंद झाली. मात्र गत वर्षातील सप्टेंबर महिना कोरोनाचा अनर्थ सांगणारा ठरला. त्या महिन्यात तब्बल ४६ जण मृत्यूमुखी पडले. 

ऑक्टोबरमध्ये October  ३३ जण दगावले. यानंतर कोरोनाचा (पहिल्या लाटेचा) भर ओसरला. नोव्हेंबर November २० मध्ये ९ तर डिसेंबर December मध्ये १८ बळी गेले. त्यानंतर नवीन वर्षात पहिल्या २ महिन्यांत कोविड काहीसा शांत राहिला. मात्र जानेवारीमध्ये १६ तर फेब्रुवारीमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. मात्र मार्च March २०२१ मध्ये कोरोनाने पुन्हा जोरदार दमदार कमबॅक करीत जिल्ह्यात मुसंडी मारली. Death Rate in Buldana due to Corona is scary

हा हल्ला इतका घातक होता की एका महिन्यातच तब्बल ७६ जणांचे बळी गेले आहेत. म्हणजे दिवसाकाठी किमान दोन बळी गेलेत. एप्रिल मध्यावरच मृत्यूचा आकडा ४५ पर्यंत गेला आहे. यामुळे हा महिना देखील मार्च महिन्याशी स्पर्धा करणारा 
ठरला आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live