प्रवासातून कोरोना पसरू नये यासाठी औरंगाबाद महापालिकेचा हा निर्णय

साम टीव्ही
शनिवार, 22 ऑगस्ट 2020
  • औरंगाबादमध्ये एसटी प्रवाशांची कोरोना तपासणी
  • औरंगाबाद महापालिकेचा निर्णय
  • प्रवासातून कोरोना पसरू नये याची दक्षता

एसटी प्रशासनाने आंतरजिल्हा प्रवासाला मुभा दिलीय. पण त्यामुळे कोरोनाच्या फैलावाचीही शक्यता निर्माण झालीय. ही बाब लक्षात घेत औरंगाबाद महापालिकेने एक योजना तयार केलीय. पाहूयात रिपोर्ट.

औरंगाबादमधून इतर जिल्ह्यात एसटी बसने ये जा करायची असेल, तर प्रवाशांची अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी औरंगाबादच्या मुख्य बस स्थानकांवर महापालिकेची एक टीम तैनात करण्यात आलीय. 

कोरोनाच्या संकटामुळे 22 मार्चपासून एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे 5 महिन्याच्या काळात एसटीचा जवळपास 2300 कोटींचा महसूल बुडालाय. त्यामुळे टप्प्याटप्प्याने एसटीची सेवा पुर्ववत करण्यात येतेय. शिवाय प्रवासी संख्या वाढावी यासाठी आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेला ई-पासचा नियमही शिथिल करण्यात आलाय. 

मात्र त्यामुळे एसटी प्रवासातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता निर्माण झालीय. अगोदरच औरंगाबादमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने जिल्ह्याबाहेरून औरंगाबादमध्ये येणाऱ्या प्रत्य़ेकाची अँन्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. त्यामुळे प्रवाशांच्या बस स्थानकावर रांगा लागल्यात.


संबंधित बातम्या

Saam TV Live