धुळ्यात गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील पूल बंद करण्याचा निर्णय

भूषण अहिरे
शनिवार, 24 एप्रिल 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून कडक निर्बंध लावून देखील नागरिक घराबाहेर पडणं टाळत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकच वाढत चालला आहे आणि ही बाब जिल्हा प्रशासनाच्या  निदर्शनास आल्यानंतर अखेर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शहरातील सार्वजनिक वापरासाठी असलेले मुख्य चार पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव  यांनी घेतला

धुळे - Dhule शहरामध्ये कोरोनाचा Corona प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून कडक निर्बंध लावून देखील नागरिक घराबाहेर पडणं टाळत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक अधिकच वाढत चालला आहे आणि ही बाब जिल्हा प्रशासनाच्या District Administration निदर्शनास आल्यानंतर अखेर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शहरातील सार्वजनिक वापरासाठी असलेले मुख्य चार पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी Public transport बंद ठेवण्याचा निर्णय दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव Sanjay Yadav यांनी घेतला आहे.  Decision to close bridges in the city to control crowds in Dhule

यामध्ये गणपती पूल Ganpati bridge , कालिकामाता मंदिराजवळील पूल, काजवे पूल, मोठा पूल अत्यावश्यक सेवा वगळता सार्वजनिक वापरासाठी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले, की कोरोना विषाणूमुळे उद्‍भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यात राज्यात गेल्या १३ मार्चपासून साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी सुरू आहे. कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार धुळे जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये २२ एप्रिल ते १ मे सकाळी सातपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. Decision to close bridges in the city to control crowds in Dhule

वाहतुकीसाठी पुल बंद केल्यामुळे अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांना आवर घालणं पोलीस प्रशासनाला सोपं होणार आहे. अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांना चाप बसविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.जिल्हा प्रशासनातर्फे या निर्णयाचे आदेश काढण्यात आले आहेत. पूल बंद केल्यामुळे आता शहरामध्ये अनावश्यक होणाऱ्या गर्दीवर प्रशासनाला नियंत्रण मिळविण्यासाठी मदत होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live