दहावी, बारावीच्या परीक्षा संदर्भात घातलेल्या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची नाराजी

exam 10th
exam 10th

डोंबिवली :  दहावी परीक्षा रद्द व बारावी परीक्षा Exam घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाचा कोरोनासोबत Corona टायअप झालेला दिसतो की मे मध्ये आम्ही काही करणार नाही, पण जूनमध्ये आम्ही परीक्षा घेऊ. ठराविक पालक, शिक्षक संघटनांना खूश ठेवण्यासाठी सरकारने Government    हा निर्णय घेतलेला दिसतो असा आरोप राजेंद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी केला आहे.  decision taken regarding the 10th and 12th examinations

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे Students मुल्यांकन कसे केले जाणार, त्यांना अकरावीत प्रवेश कोणत्या निकषावर दिला जाणार याविषयी पालक parents, शिक्षण teachers संस्थांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. आरटीई कायद्यानुसार विद्यार्थी परीक्षांना न बसता 8 वी पास होऊन 9 वीमध्ये आले. 2020 - 21 सालात 9 वीमधून परीक्षा न देता विद्यार्थी 10 वीत गेले. आताही हे विद्यार्थी परीक्षा न देता अकरावीत जाणार आहेत.

कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक ज्ञान मुल्यांकन न होता पुढील वर्गात गेलेल्या या मुलांना कोणत्या शाखेत कोणत्या निकषांवर प्रवेश देणार, शाळांनी केलेले अंतर्गत मुल्यांकन किती विश्वसनीय असेल असे अनेक प्रश्न विवेक पंडीत यांनी उपस्थित केले आहेत. 
कोणतीही परीक्षा रद्द करताना संबंधित शिक्षणसंस्था, बोर्डाशी Board Exam काही चर्चा केली जाते का. की केवळ ठराविक शिक्षण संघटना, पालक यांना खूष ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जातो. कोरोना संकट मोठे आहे, पण त्याला तोंड दिले पाहीजे. decision taken regarding the 10th and 12th examinations

अकरावीला कोणत्या बेसवर प्रवेश द्यायचा याविषयी गोंधळ उडण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशासाठी एखादी ऑनलाईन प्रवेशपरीक्षा घेण्याचा विचार केला तर त्यामध्ये भ्रष्टाचार होणार. मग ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचा विचार सरकार करीत असेल तर शाळांना तुम्ही प्रिलियम का नाही घेऊ देत. आरोग्य महत्वाचे आहेच परंतू त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करु नये एवढेच सरकारला सांगणे आहे असेही ते म्हणाले.

दहावी परीक्षा रद्द केल्याने पालक आणि  विद्यार्थ्यांमध्ये नाराजी  ...

दहावी परीक्षा रद्द व बारावी परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयाविषयी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर.आता पालक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. किमान दहावीची परीक्षा ऑनलाईन तर घ्यायला हवी असे विद्यार्थ्यांचे मत आहे.तर परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना  न्याय मिळणार नाही आणि शिक्षकाच्या मेहनतीला सुद्धा न्याय मिळणार नाही असे पालकांनचे म्हणणे आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com