VIDEO : लोणावळ्याजवळ डेक्कन क्विनचा भीषण अपघात टळला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

रेल्वे ट्रॅकवर दोन रेल्वे समोरसमोर आल्याने एकच गोंधळ उडाला. पण चालकांच्या दक्षतेमुळे हा अपघाच वेळीच टळला.  

 

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर होणाऱ्या अपघातांची भीषणता वाढत असतानाच, आता लोणावळा रेल्वे स्टेशनच्या अलीकडे रेल्वेचाच एक मोठा अपघात होता होता टळला. रेल्वे ट्रॅकवर दोन रेल्वे समोरसमोर आल्याने एकच गोंधळ उडाला. पण चालकांच्या दक्षतेमुळे हा अपघाच वेळीच टळला.  

 

 

 

लोणावळ्याअलीकडे पाच किमी अंतरावर हा भीषण अपघात होता होता राहिला. डेक्कन क्विन आणि लोकल अचानक एकाच ट्रॅकवर एकमेकींच्या समोर आल्या व चालकांच्या दक्षतेमुळे वेळीच नियंत्रणात येऊन थांबल्या. या रेल्वेंमध्ये 200 ते 300 मीटर अंतर राहिले होते. चालकांना नियंत्रण मिळवला आले नसते, तर होत्याचे नव्हते झाले असते. 

या घटनेवरून लक्षात येते की रस्त्यांप्रमाणे रेल्वे मार्गांवरही वर्दळ वाढत आहे. मात्र, असा प्रकार घडणे हे गंभीर स्वरूपाचे असल्याने याबाबत आधी सिग्नल मिळाले नाहीत का, डेक्कन क्विनसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या रेल्वेबाबत असा प्रकार घडल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. 

Web Title: Deccan queen and local railway accident avoided by Drivers at Lonavla


संबंधित बातम्या

Saam TV Live