पुण्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूत घट

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

पुणे शहरात आटोक्यात येत असलेल्या कोरोना ने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. 

पुणे - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे.  मात्र असे असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडणाऱ्या पुण्यात  आज नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घाट झाली आहे.(Decrease in deaths of corona patients in Pune)

पुणे शहरात आटोक्यात येत असलेल्या कोरोना ने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.  मात्र आता या रुग्ण वाढीतून पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात एकुण ४५० रुग्णांची नोंद झाली आहे तर ५१५  रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहे. तर २७ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे.

हे देखील पाहा

राज्यात आता रोजच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे.  

The Family Man-2: अभिनेता मनोज बाजपेयीची भावनिक पोस्ट

पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ४,७१,२२८ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत  ८,३४०. रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ५१५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर ४,५७,६७५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात  सध्या ५२१३ रुग्णांवर उपचार उपचार सुरु आहे. तर आज पुण्यात ८१६६ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live