नांदगाव-हिंगणघाट उड्डाणपुलाचे नितिन गडकरींच्या हस्ते लोकार्पण

राष्ट्रीय राजमार्ग चौरेचाळीस नागपूर हैदराबाद सेक्शन वर 77 पॉइंट 750 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर नांदगाव-हिंगणघाट उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते रस्त्याच्या मधोमध रिबिन कापून करण्यात आले.
नितीन गडकरी
नितीन गडकरीसाम टीव्ही

सुरेंद्र रामटेके

राष्ट्रीय राजमार्ग चौरेचाळीस नागपूर हैदराबाद सेक्शन वर 77 पॉइंट 750 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर नांदगाव-हिंगणघाट उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते रस्त्याच्या मधोमध रिबिन कापून करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावर, बाजार समितीचे सभापती अँड. सुधीर कोठारी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, यासह नॅशनल हायवे चे अधिकारी उपस्थित होते. (Dedication of Nandgaon-Hinganghat flyover by Nitin Gadkari)

सदर उड्डाणपुलावरून शंभर किलोमीटर प्रति तास वेगा प्रमाणे वाहन चालवता येते. उड्डाणपुलामुळे शहरातील रहदारी व राष्ट्रीय महामार्गाची रहदारी याचा प्रवास सुटसुटीत व सहज झाला ग्रेड रेटर उड्डाणपुलामुळे दोन्ही वाहनांची रहदारी निश्चित झाली, असल्याने नांदगाव चौकांमध्ये वाहन अपघात कमी होईल अपघाताला आळा बसेल सदर उड्डाणपुलामुळे वेळ व इंधन वाचेल आणि प्रदूषण नियंत्रित करण्यास मदत होईल. उड्डाणपुलाच्या खालील भागामध्ये वृक्षारोपण व लँडस्केपिंग करून सौंदर्यीकरण करण्यात आल्या मुळे प्रदूषण कमी करण्यात मदत होईल व उड्डाणपुलाचा खालील भागात अनधिकृत पार्किंग होणार नाही तसेच पुलाखालील भाग स्वच्छ राहील.

उड्डाणपुलाची एकूण किंमत 85.28 करोड रुपये लागत लावून हा उड्डाणपूल तयार करण्यात आला या उड्डाण पुलाची लांबी 1.42 किलोमीटर असून उड्डाणपूल सहा पदरी मार्गाचा तयार करण्यात आला आहे. उड्डाणपुलाची मुख्य रस्त्याची रुंदी 24 मीटर आहे. तर सर्विस रोड ची लांबी 1.42 मीटर व रुंदी 7.5 मीटर आहे आणि रोडच्या दोन्ही बाजूस सर्विस रोड देण्यात आला आहे .सदर ठिकाणी ट्राफिक काऊंटर बसविण्यात आले आहे.

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com