दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अरुण जोशी
शनिवार, 1 मे 2021

मेळघाट Melghat व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस Police कोठडीत असलेला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याला आज (दि. १ मे) धारणीच्या न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयायीन कोठडी सुनावली आहे

अमरावती : मेळघाट Melghat व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस Police कोठडीत असलेला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याला आज (दि. १ मे) धारणीच्या न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयायीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता दिपाली चव्हाण प्रकरणातील सह आरोपी असलेल्या श्रीनिवास रेड्डीच्या अडचणीत वाढ झाली आहे. Deepali Chavan Suicide Case Shriniwas Reddy Remanded to Judicial Custody

चार दिवसांपूर्वीच त्याला धारणी पोलीसांनी नागपुरातून Nagpur अटक केली होती. त्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात Court दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आज त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी Judicial Custody सुनावली आहे .दरम्यान, श्रीनिवास रेड्डीला जामीन मिळावा यासाठी त्याने बरेच प्रयत्न केले. पण, गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. 

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर Suicide राज्यभर पडसाद उमटले होते. रेड्डीच्या अटकेची मागणी जोर धरली होती. घटनेच्या २६ दिवसांनी त्याला अटक करण्यात आली होती हे विशेष.  सरकार पक्ष्याच्या वतीने अॅड. भारत भगत यांनी काम पहिले तर आरोपी रेड्डी कडून वकील मनीष जैसवानी,दीपक वाधवानी यांनी काम पाहिले. Deepali Chavan Suicide Case Shriniwas Reddy Remanded to Judicial Custody

महिनाभरापूर्वी श्रीनिवास रेड्डींचे निलंबन
आरएफओ RFO दीपाली चव्हाण यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक सुसाईड नोट लिहिली आणि गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर डीएफओ DFO विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरुन तात्काळ अटक करण्यात आली. तसंच त्यांचं निलंबनही करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी याची उचलबांगडी करण्यात आली होती. तर महिन्याभरापूर्वी रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live