दीपिका आणि तीच्या आतापर्यंतच्या अफेअर्सची कॉन्ट्रोव्हर्सी ... वाचा मस्तानीच्या लव्ह लाईफची लीस्ट

साम टीव्ही
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020
  • दीपिका द कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन
  • दीपिका आणि वाद यांचं अतूट नातं
  • दीपिकाचे अफेअर्स कायम चर्चेचा विषय

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण कायमच चर्चेत राहिलेय ती तिच्या लव्ह लाईफमुळे आणि अफेअर्समुळे. दीपिकाच्या अफेअर्सची लिस्ट मोठी आहे.

याची सुरुवात होते ती निहार पांड्यापासून. 2005 साली अॅक्टिंग स्कूलमध्ये असताना दोघांचं प्रेम जुळलं. मुंबईत दोघं लिव इन रिलेशनमध्येही राहिले. पण तीन वर्षांत त्यांचं ब्रेकअप झालं. 

निहारनंतर दीपिका उपेन पटेलच्या प्रेमात पडली. उपेन लॉंग टर्म रिलेशनसाठी तयार नव्हता. त्यामुळे हे नातंही पुढे जाऊ शकलं नाही. यानंतर दीपिकाच्या आयुष्यात महेंद्र सिंह धोनीची एन्ट्री झाली. स्वतः धोनीने या नात्याबद्दल गौप्यस्फोट केला होता.  मात्र दीपिकाने करिअरवर फोकस करण्याचं ठरवलं आणि या नात्यातून बाहेर पडली. पण तोच युवराज तिच्या आयुष्यात आला. दोघं  बऱ्याच इव्हेंट्स मध्ये एकत्र दिसले. मात्र हेही नातं पुढे टिकलं नाही. 

यानंतर दीपिकाचं नाव जोडलं गेलं ते, काश्मिरी हंक मुजामिल इब्राहिम सोबत दोघांनी एकत्र एका जाहिरातीचं चित्रिकरण केलं. त्यानंतर वर्षभरातच त्यांचं ब्रेकअप झालं. 

पुढे दीपिका विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्ल्याच्या प्रेमात पडली. तेव्हा ती किंगफिशरची कॅलेंडर गर्ल होती. एका आयपीएल मॅच दरम्यान दोघं किस करतानाही दिसले. मात्र याही नात्याचा शेवट ब्रेकअपनेच झाला.

यापुढे दीपिका हँडसम कपूर रणबीर कपूरच्या प्रेमात पडली. यादरम्यन दीपिकाच्या मानेवरच्या टॅटूचीही जबरदस्त चर्चा झाली. पण या नात्यात कॅट आडवी आली. आणि डबलडेट करणाऱ्या रणबीरला दीपिकाने टाटा-बायबाय केलं.

रणबीर नंतर रणवीरचा नंबर लागला. दोघंही प्रेमात पडले. आणि हे नातं अखेर लग्नापर्यंत पोहोचलं. आता दोघं हॅप्पीली मॅरिड आहेत. मात्र दीपिकाच्या नावाशी जोडली गेलेली ही इतकी नावं काही लोकांच्या मनातून गेलेली नाहीत. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण खऱ्या आयुख्या मात्र अफेअर्स क्वीन ठरली.


संबंधित बातम्या

Saam TV Live