नक्की वाचा ! कुठे आहेत आठ लाख नोकऱ्या 

साम टीव्ही न्यूज
रविवार, 24 मे 2020

उर्वरित कारागीर गरजेनुसार काम करणारे आहेत. पगारदारांपैकी ७० टक्के अर्थात सुमारे ५.४० लाख कामगार परप्रांतीय आहेत. हे सर्व आता जवळपास गावी परतले आहेत. त्याजागी आता स्थानिक तरुणांना कामाची संधी आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता रोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते.

मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वांत मोठे बंदरही मुंबईजवळच आहे. यामुळेच येथील सोने-चांदीचा व्यवसाय हा देशातील सर्वांत मोठ्या व्यवसायांपैकी आहे. देशातील ६५ टक्के व्यवसाय मुंबईत आहे. याच सराफा क्षेत्रात पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर प्रदेशातील लाखो कारागीर कार्यरत आहेत. त्यांचा आकडा १० लाखांच्या घरात आहे. या १० लाखांपैकी ८० टक्के कारागीर पगारी आहेत. उर्वरित कारागीर गरजेनुसार काम करणारे आहेत. पगारदारांपैकी ७० टक्के अर्थात सुमारे ५.४० लाख कामगार परप्रांतीय आहेत. हे सर्व आता जवळपास गावी परतले आहेत. त्याजागी आता स्थानिक तरुणांना कामाची संधी आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता रोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते.

 मुंबई शहर आणि परिसरात या क्षेत्रात ७५ हजार बांधकाम मजूर नोंदणीकृत आहेत. तर ठाणे व नवी मुंबई परिसरातील हा आकडा ३५ हजार आहे. क्रेडाईशी संबंधित बांधकाम व्यावसायिकांनुसा, यापैकी ८० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे बांधकाम सुरू होताच या क्षेत्रात किमान १ लाख रोजगार असेल.
लॉकडाउनमुळे मुंबईसह देशभरातील लाखो नागरिकांनी रोजीरोटी गमावली आहे. तर, हजारोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दुसरीकडे सर्वांच्या हाताला काम देणाऱ्या मुंबईतच आता रोजगार बुडाल्याने परराज्यांतील लाखो कामगारांनी स्वराज्यांमध्ये परतण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हीच महाराष्ट्रातील तरुणांसाठी संधी ठरणार आहे. मुंबईत विविध क्षेत्रांमध्ये आठ लाख रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध झाले आहेत.

 

WebTittle :: Definitely read! Where are the eight lakh jobs


  


संबंधित बातम्या

Saam TV Live