दिल्लीतील शोतकरी आंदोलनाची झळ महाराष्ट्रातल्या गरिबांना! वाचा काय घडलंय

साम टीव्ही
शनिवार, 5 डिसेंबर 2020
  • दिल्लीतील आंदोलनाचा फटका महाराष्ट्राला
  • रेशनिंग दुकानांमध्ये धान्याचा मोठा तुटवडा
  • रेशन धान्याची वितरण व्यवस्था कोलमडली

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा भडका उडालाय दिल्लीत. पण त्याची धग आता महाराष्ट्राला जाणवू लागलीय. कारण, या आंदोलनामुळे रेशनिंगवर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलीय.

शेतमालाच्या हमीभावासाठी आणि कृषी कायद्यात बदल करण्यासाठी देशभरातील शेतकरी राजा दिल्लीत धडकलाय. दिल्लीच्या उंबरठ्यावर आंदोलनाचा हा भडका उडालाय. पण त्याची धग आता महाराष्ट्रात जाणवू लागलीय. कारण, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील रेशनिंग दुकानांत धान्यच पोहोचू शकलेलं नाहीय.

शेतकरी आंदोलनाची धग महाराष्ट्राला
आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक रेल्वे गाड्या रोखून धरल्यायत, त्यामुळे उत्तर भारतातून महाराष्ट्रात रेल्वेद्वारे होणाऱ्या धान्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय. त्याचसोबत, पंजाबहून येणारं गहू, तांदळासह इतरही धान्य रेल्वेतच अडकून पडलंय. महत्त्वाचं म्हणजे,  नाशिक, अहमदनगरसह अनेक जिल्ह्यांत स्वस्त धान्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावं लागतंय.

मातीत राबणारा शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढतोय. त्यामुळे, त्यांच्या मागण्यांवर विचार झालाच पाहिजे, पण, त्याचसोबत या आंदोलनामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या अन्न-धान्य पुरवठ्यावर परिणाम होऊ नये आणि रेशन दुकानांवर अवलंबून असलेली गोरगरीब जनता स्वस्त धान्यापासून वंचित राहता कामा नये,  यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत.


संबंधित बातम्या

Saam TV Live