कालच्या हिंसक आंदोलनात पोलिसांची बघ्याची भूमिका? वाचा काय घडलं?

साम टीव्ही
बुधवार, 27 जानेवारी 2021

 

  • शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर फडकावला झेंडा
  • प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा लाल किल्ल्यावर कब्जा
  • दिल्ली पोलिसांची बघ्याची भूमिका?

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनीच थेट लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. यामुळे दिल्लीतील सुरक्षेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत.

ही दृश्य पाहा, राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याची ही दृश्य. ट्रॅक्टर मोर्चातील शेतकऱ्यांनी थेट  लाल किल्ल्यावर कब्जा केला. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर झेंडाही फडकवला. आक्रमक आंदोलकांसमोर पोलिसही हतबल झाल्याचं  पाहायला मिळालं. जवळ एक तास लाल किल्ला आंदोलकांच्या ताब्यात होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अधिकची कुमक मागवण्यात आली. मग हळूहळू आंदोलकांनी लाल किल्ल्यातून माघार घेतली.

शेतकऱ्यांनी फडकावला झेंडा

विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या परेड निमित्त राजधानी दिल्लीत तगडा बंदोबस्त होता. मात्र एवढा तगडा बंदोबस्त असताना मोर्चेकरी लाल किल्ल्यापर्यंत पोहचले. यावेळी पोलिसांनी आखून दिलेले मार्ग आंदोलकांनी धुडकावला. आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला खरा मात्र हिंसक आंदोलकांपुढं पोलिसांनी हात टेकले. दिल्लीतील या घटनेनं अनेक सवाल उपस्थित होतायंत. आंदोलनाला हिंसक वळण लागू शकतं याची कल्पना गुप्तचर यंत्रणांना नव्हती का?,आंदोलक लाल किल्ल्यावर चढेपर्यंत पोलिस काय करत होते? शेतकऱ्यांनी  ट्रॅक्टर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ का? या प्रश्नाची उत्तरं येत्या काळात मिळतील अशी अपेक्षा आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live