लग्नात वधूवर गोळीबार, तरीही लागले लग्न...

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा विवाहमंडपात आली व विवाहसोहळा पार पडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा विवाहमंडपात आली व विवाहसोहळा पार पडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नवी दिल्लीच्या शाकारपूर भागात ही घटना घडली. 25 वर्षीय नवरीवर कोणी गोळीबार केला हे समजू शकलेले नाही. नवरीने सांगितले की, 'गोळीबार कोणी केला हे समजले नाही. परंतु, विवाह सोहळा सुरू असताना अचानक पायवर गोळी लागल्यामुळे जखमी झाले. जखमी अवस्थेतच रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी गोळी बाहेर काढून पट्टी केली. काही वेळातच पुन्हा विवाहमंडपात आले आणी विवाहसोहळा पार पडला.'

पोलिस अधिकारी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विवाह समारंभादरम्यान झालेल्या गोळीबाराची तक्रार दाखल झाली आहे. याबाबत तपास सुरू असून, दोन संशयितांचा आम्ही शोध घेत आहोत.'

दरम्यान, विवाह सोहळयात गोळीबार होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही दक्षिण दिल्लीत लग्नाची वरात विवाहस्थळाच्या दिशेने चाललेली असताना दोन आरोपींनी नवऱ्या मुलावर गोळया झाडल्या होत्या. या गोळीबारात नवऱ्या मुलाच्या उजव्या हाताला गोळी लागली होती. त्यावेळी सुद्धा तीन तासाच्या उपचारानंतर नवऱ्याने मंडपात जाऊन विवाहाचे विधी पूर्ण केले होते. 2016 मध्ये उत्तर प्रदेशात नवरी मुलीवर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये नवरीचा मृत्यू झाला होता.

Web Title: Delhi Groom Shot but Gets Married


संबंधित बातम्या

Saam TV Live