दिल्लीतील लॉकडाउन आठवडाभर वाढवला

New Delhi
New Delhi

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत New Delhi कोरोना Corona महामारीच्या उद्रेकाची परिस्थिती आता परिस्थिती झपाट्याने सुधारत असल्याचा दावा करतानाच, सावधगिरीचा उपाय म्हणून दिल्लीतील लॉकडाउन Lock Down आणखी आठवडाभरासाठी म्हणजे २४ मे पर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejariwal यांनी केली. Delhi Lock Down Extended for week

कोरोना रुग्णांची संख्या मागील चोवीस तासांमध्ये ६ हजार ४०० च्या आसपास आली. संक्रमण दरदेखील ११.३२ टक्क्यांपर्यंत घटला आहे. मात्र रोज मृत्युमुखी पडणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संख्या अजूनही तीनशेच्या आसपास आहे. त्यामुळेच दिल्लीकरांना सावधगिरीचा उपाय बाळगावा लागेल असे सांगत केजरीवाल यांनी वाढीव लॉकडाउनचे समर्थन केले.

हे देखिल पहा

१९ एप्रिलला केजरीवाल यांनी पहिला सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला. तो आता पाचव्यांदा वाढवून २४ मे रोजी पहाटे ५ पर्यंत कायम ठेवला आहे. दुसरीकडे लॉकडाउन घोषित असला तरी, दिल्लीतील बस, रिक्षा, खासगी वाहने, छोटे व्यावसायिक यांचे व्यवहार बहुतांश प्रमाणात नेहमीप्रमाणे सुरू आहेत. Delhi Lock Down Extended for week

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेली दिल्ली मेट्रो आणि आठही प्रमुख जिल्ह्यांमधील मोठ्या बाजारपेठा मात्र कडक बंद आहेत. दिल्लीत रुणसंख्येत लक्षणीय घट होत आहे. मात्र सारे व्यवहार एकदम खुले केले तर, पहिल्या लाटेनंतरची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे, असे सांगून केजरीवाल म्हणाले की राज्य सरकारने प्रत्येक वेळा लॉकडाउन वाढवताना विचारात घेतले आहे. मुख्य व्यापारी संघटना आणि दिल्लीकरांनीही प्रत्येक वेळेला लॉकडाउन एकेका आठवड्याने वाढवण्याच्या बाजूने कौल दिला आहे.

दिल्लीतील स्थिती
मागच्या चोवीस तासातील नवीन रुग्ण ६,४३०
मृत्युमुखी पडलेले ३३७
कोरोनातून बरे होणारे ११,५९२
एकूण सक्रिय रुग्ण ६६,२९५
एकूण कोरोनाबळी २१,२४४

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com