दिल्लीत महिलेचा मृत्यू, भारतात करोनाचा दुसरा बळी

 दिल्लीत महिलेचा मृत्यू, भारतात करोनाचा दुसरा बळी


नवी दिल्लीः करोना व्हायरसने देशात दुसरा बळी घेतला आहे. कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. आता दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ६९ वर्षाच्या या महिलेवर दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. करोनाच्या रुग्णांवर दिल्लीत राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

महिलेला तिच्या मुलामुळे करोनाचा संसर्ग झाला होता. तिचा मुलगा जपान, जिनेव्हा आणि इटलीचा दौरा करून दिल्लीत घरी परतला होता. तपासणीत त्याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तो ४६ वर्षांचा आहे. त्याच्या कुटुंबातील सर्वांची करोनाची तपासणी करण्यात आली. पण आईला सोडून कुणालाही करोनाची लागण झाली नसल्याचं तपासणीत स्पष्ट झालं. यानंतर मुलावर आणि त्याच्या आईवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. यात आईचा करोनामुळे मृत्यू झाला. भारतात करोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.

देशात ८१ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. केरळमधील तिघांना आणि दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमधील ७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. करोनाची लागण झालेल्या ८१ जणांमध्ये ६४ भारतीय आहेत. तर १६ जण इटलीचे आणि १ कॅनडाचा नागरिक आहे.

WebTittle ::  Delhi woman dies, second victim of coronas in India


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com