Eggs
Eggs

अंडी खात आहेत 'भाव', विक्रीचे प्रमाण कमालीने वाढले...

बुलडाणा : गेल्या वर्षी बर्ड फ्लू Bird Flue अन कोरोनाची Coroan भीती पाहता अंडे Eggs आणि चिकनची Chicken मागणी घटली होती. परंतु कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आहारात अंडे खाण्याचा सल्ला डॉक्‍टर Doctor देत असल्याने आता अंड्यांची प्रचंड मागणी वाढली असून अंड्याचा देखील भाव वधारला आहे. तर मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी होत असल्याने, अंडे देखील भाव खात आहेत. Demand of Eggs rising in Corona Wave due to Doctors Advice 

गेल्यावर्षी ७० रुपये ट्रे या दराने देखील कोणी अंडी घ्यायला तयार नव्हते. आणि आता याच ट्रेची किंमत १५०  रुपयांवर गेली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट ओढावले तेव्हा अफवा, गैरसमज आणि चुकीच्या माहितीमुळे अंडी, चिकन, मांस याकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. त्यावेळी अक्षरश: अंडी फेकुन देण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर मात्र हा गैरसमज दूर होऊन अंडी आणि मांसाहार Non-Veg Food सुरु झाला. पहिल्या लॉकडाऊनमध्ये Lock Down अंड्यांकडे कुणी पाहतही नव्हेत तर आता पुन्हा लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अंड्यांची मागणी प्रचंड वाढली असून अंड्यांचे दरही वधारले आहेत...

कोरोना काळात अंडी अत्यंत महत्वाची आणि लाभदायक ठरत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. शासकीय, खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांकडून अंडी खाण्याचा सल्ला दिला जाऊ लागला. त्यामुळे अंड्यांना पुन्हा घरोघरी महत्वाचे स्थान प्राप्त झाले. अंड्यांमध्ये सर्वाधिक प्रोटीन्स Protines आहेत. अंड्यांमुळे शरिरात रोगप्रतिकार शक्ती Immunity वाढते. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात अंड्यांचे सेवन महत्वाचे आणि गरजेचे ठरत आहे. Demand of Eggs rising in Corona Wave due to Doctors Advice 

लॉकडाउननंतर अंड्यांच्या दरात वाढ झाली. हॉटेल, हातगाड्या, रेस्टॉरंटस्‌ बंद असली तरी कोव्हीड सेंटर, रुग्णालये, घरा घरात अंड्यांना मागणी वाढली आहे. परिणामी, अंड्यांचे दर वाढले आहेत. दुकानांवर ३० अंड्यांचा ट्रे १५०  रुपयांना विकला जात गेला असून या आठवड्यात आणखी भाव वाढ होईल, अशी माहिती अंडी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com