मोदी सरकारकडे जितेंद्र आव्हाडांनकडे 'ही' मागणी

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 4 जून 2020

करोनाच्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. मुंबईतील करोना बाधितांची एकूण संख्या आतापर्यंत ४० हजारांच्याही पुढं गेली आहे. त्यांच्यावर मुंबई शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना सेवा देणारे कर्मचारी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये तसंच, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, विरारपर्यंत राहणारे आहेत. लोकल गाड्या सुरू नसल्यानं त्यांना रुग्णालयांत पोहोचताना अडचणी येत आहेत. 

मुंबई: येत्या ८ तारखेनंतर लॉकडाऊन आणखी शिथिल होणार असून मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी देखील लोकल काही प्रमाणात सुरू असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा विचार करता आव्हाड यांच्या मागणीला महत्त्व आहे.खासगी रुग्णालयांत बेड असूनही कर्मचारी नसल्यानं ते मोकळेच पडून आहेत. आरोग्य कर्मचारी उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयांनाही पूर्ण क्षमतेनं रुग्णसेवा करणं शक्य होणार आहे.महाराष्ट्र सध्या करोनाच्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. मुंबईतील करोना बाधितांची एकूण संख्या आतापर्यंत ४० हजारांच्याही पुढं गेली आहे. त्यांच्यावर मुंबई शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना सेवा देणारे कर्मचारी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये तसंच, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, विरारपर्यंत राहणारे आहेत. लोकल गाड्या सुरू नसल्यानं त्यांना रुग्णालयांत पोहोचताना अडचणी येत आहेत. 

'करोना साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारनं मुंबईत काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू करायला हव्यात,' अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

 

 

 

आव्हाड यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. 'मुंबईतील रुग्णालयांत सेवा देणारे बहुसंख्य कर्मचारी दूर उपनगरांत किंवा मुंबईबाहेर राहतात. लोकल ट्रेनची सोय असल्याशिवाय ते कामावर रुजू होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मोदी सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही प्रमाणात लोकल सुरू कराव्यात, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

WebTittle ::'This' demand from Modi government to Jitendra Awhad

 


संबंधित बातम्या

Saam TV Live