कोरोना वाढल्याने लातूरमध्ये ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीत पुन्हा वाढ...  

साम टिव्ही ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दिवसाला 700 रुग्ण वाढत असल्याने कोविड सेंटरची संख्याही वाढविण्यात आली आहे

लातूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दिवसाला 700 रुग्ण वाढत असल्याने कोविड (COVID) सेंटरची संख्याही वाढविण्यात आली आहे. तर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी योग्य ते नियोजन केले जात आहे. मात्र, मागणी 1 हजार सिलिंडरची आहे आणि पुरवठा 700 सिलिंडरचा होत आहे. त्यामुळे  मागणी अधिक उत्पादन कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे.Demand for oxygen cylinders rises again in Latur 

रुग्णसंख्या वाढत राहिली, तर ऑक्सिजनसाठी ( Oxygen) योग्य ते नियोजन करावे लागणार आहे.जिल्ह्यात 5 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे 12 नंबर पाटी, समाजकल्याण विभागाची इमारत तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय हे कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. अनेकांना होम आयसोलेशन सल्ला देण्यात आला असला, तरी शहरातील तीन ठिकाणी उपचार सुरू आहेत.

दिवसाकाठी 1 हजार ऑक्सिजन सिलिंडरची मागणी येथील विजय एजन्सीकडे होत आहे. मात्र, 700 सिलिंडरची निर्मिती होत असल्याने तुटवडा हा कायम आहे. मागणी वाढतच असताना जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या सूचना एजन्सीधारकांना देण्यात आल्या आहेत. केवळ 20 टक्के विक्री ही खाजगी उद्योगांसाठी तर 80 टक्के सिलिंडर हे उपचारासाठी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.Demand for oxygen cylinders rises again in Latur  

Edited By - Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live