तरुणीच्या कामाची 'डेटॉल' राष्ट्रीय कंपनीकडून दखल; हँडवॉश बॉटलवर छापला फोटो !

Dettols national company noticed the young woman's work
Dettols national company noticed the young woman's work

उस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या मनीषा वाघमारे या तरूणीने कोरोना Corona काळात केलेल्या अन्नदानाची दखल 'डेटॉल' या देशातील राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतली आहे. 'डेटॉल सॅल्यूट्स' Dettol salutes या अभियानाअंतर्गत युवतीचा फोटो त्यांच्या हँडवॉश Handwash बॉटलवर छापला आहे. Dettols national company noticed the young woman's work

तसेच मनीषाला डेटॉल कंपनीकडून मानपत्रही देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती डेटॉल च्या ट्विटर हॅन्डलवरून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मनीषा वाघमारे या उच्चशिक्षित तरुणीला समाजकार्याची आवड असल्याने गेल्या वर्षभरापासून ती कोरोना काळात आपली सेवा बजावत आहे. गतवर्षी जागृती ग्रुप पुणे अाणि होप फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांनी पुणे, उस्मानाबाद आणि नगर या जिल्ह्यांमध्ये गरीब लोकांना अन्नधान्याचे कीट वाटप केले. पण यावर्षी तिने कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डब्बे पुरविण्याचे काम स्वखर्चातून  हाती घेतले. रोज दिवसभरात दीडशेहून अधिक लोकांना ३० किलोमीटर गाडीवर जाऊन  शासकीय आणि खाजगी रुग्णालयात जेवणाचे डब्बे ती पोहोच करत आहे.

सुरुवातीला त्यांनी अवघ्या शंभर डब्यापासून याची सुरुवात केली. मात्र, त्यांचे काम पाहून देश विदेशातील दानशूरांनी त्यांच्या या कार्याला आर्थिक हातभार लावला. त्यामुळे जेवणाचे डब्बे वाढविण्यात आले. वास्तविक पाहता मनीषा वाघमारे यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. १६ वर्षांपूर्वी त्यांच्या वडीलांचे छत्र हरवले होते. त्यांच्या आई अंबिका वाघमारे  या चप्पल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.  

हे देखील पहा - 

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे त्यांचा हा व्यवसाय डगमगला आहे. तरीही त्यांनी मागे न हटता अन्नदान करण्याचे काम सुरू ठेवले आहे. या कामात आईसोबत तिच्या दोन बहिणी माया आणि तेजल या देखील सहकार्य करत असतात. 

मनीषाच्या याच कामाची दखल डेटॉल या राष्ट्रीय कंपनीने घेतली. डेटॉल हँडवॉश उत्पादनावर  'डेटॉल सॅल्यूट्स' या शीर्षकाखाली मनीषाच्या फोटोसह तिने केलेल्या कामाची माहिती छापली आहे. मनीषा ही पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. भविष्यात तिला अधिकारी व्हायचं आहे. पुण्यातील तिचे काही मित्रमैत्रिणी हे सामाजिक कार्यात योगदान देत असतात. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत मनीषाला समाजकार्याची आवड निर्माण झाली. संकटांना आणि परिस्थितीवर मात करत समाजकार्य करणार्‍या  तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'साम टीव्ही' ने कांही दिवसांपूर्वी मनीषाच्या कामाची दाखल घेत, स्पेशल रिपोर्ट केला होता, त्याबद्दल तिने 'साम टीव्ही'चे ही आभार मानले आहेत.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com