नागपुरातील मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित ! कोरोना लसीच्या चाचणीत निष्कर्ष

संजय डाफ
बुधवार, 9 जून 2021

नागपूरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेक लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या नागपूरात लहान मुलांच्या कोरोना लसीची चाचणी सुरू आहे.

नागपूर : नागपूरात Nagpur कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेनंतर अनेक लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज Antibodies विकसित झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या नागपूरात लहान मुलांच्या कोरोना लसीची  चाचणी Vaccine सुरू आहे. या चाचणीत निवडण्यात आलेल्या १२ ते १८ वयोगटातील ५० पैकी १० मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित झाल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पालकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. Development of antibodies in many young children in Nagpur

लहान मुलांची लसीकरण चाचणी करणारे मुख्य समन्वयक डॉ. वसंत खडतकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. सध्या नागपूरात लहान मुलांच्या कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. रविवारपासून या चाचणीला सुरुवात झाली. यासाठी १२ ते १८ या वयोगटातील ५० मुलांची निवड करण्यात आली. लस देण्यापूर्वी या सर्व मुलांची सुरुवातीला अँटिबॉडीज चाचणी करण्यात आली. या ५० पैकी १० मुलांमध्ये आधीच अँटिबॉडीज विकसित झाल्याचं या चाचणीत निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे या मुलांना कोरोना झाल्याची पार्श्वभूमी नाही, तसेच त्यांच्या जवळच्या व्यक्तीनाही कोरोनी झाला नव्हता.

SBI: पैसे काढणे होणार आता महाग; चेकबुकसाठीच्याही नियमांत बदल  

लहान मुलांमध्ये अँटिबॉडीज विकसित होणे ही चांगली बाब आहे. या मुलांना कोरोना झाला नसल्याची पार्श्वभूमी नसली तरी इतर मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून त्यांना नकळत कोरोना संसर्ग झाला असावा, मात्र त्याची लक्षणं जाणवली नसल्यानं त्यांना माहिती झालं नसेल असं डॉक्टरांचं मत आहे.

हे देखील पहा -

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यात ४९ टक्के मुलांना नकळत कोरोना होऊन गेला होता. त्यांच्या शरीरात अँटिबॉडीज विकसित झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत Second Wave सुद्धा अनेक मुलांना नकळत कोरोना होऊन त्यांच्यात अँटिबॉडीज विकसित झाल्या असल्याची शक्यता आहे. यावर डॉक्टरांचे संशोधन सुरु आहे. 

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live