सॅनिटरी पॅड एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा विकसित

साम टीव्ही
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

महिलांनी वापरलेल्या सॅनिटरी पॅडची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची कशी ही खूप मोठी समस्या आहे.मात्र ही समस्या पॅड केअर लॅब या पुण्यातील स्टार्टअपने सोडवलीय

महिलांनी वापरलेल्या सॅनिटरी पॅडची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची कशी ही खूप मोठी समस्या आहे.मात्र ही समस्या पॅड केअर लॅब या पुण्यातील स्टार्टअपने सोडवलीय. पुण्यातील तरुणांनी एकत्र येत सॅनिटरी नॅपकिन्सच्या पर्यावरणपूरक विघटनावर भर देत अनोखा मार्ग शोधलाय 

महिलांनी वापरलेले पॅड नष्ट करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना सध्या नाहीय. त्यामुळे देशात दहमहा वापरल्या जाणा-या सुमारे १० लाख पॅडच्या विघटनाची समस्या निर्माण झालीय. पॅडचा वापर केल्यानंतर ब-याचदा ते घरातील इतर कच-यासोबत कचरापेटीत टाकले जाते किंवा मोकळ्या जागी किंवा सांडपाण्यात फेकून दिले जाते. त्यातून आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्या दिवसांच्या काळात महिलांना भेडसावणारी ही समस्या पॅड केअर लॅब या पुण्यातील स्टार्टअपने सोडवलीय.  हे स्टार्टअप पॅडबीन आणि ‘पॅडकेअर सिस्टीम या यंत्रणांच्या माध्यमातून पॅडची पर्यावरण पूरक विल्हेवाट लावतायत. 

 
 घरगुती, औद्यागिक क्षेत्रातील, ई-वेस्ट आणि वापरलेले सॅनिटरी पॅड, लहान मुलांना वापरले जाणारे डायपर, कंडोम अशा कच-याचं करायचे काय यावर विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. या सर्वात पॅड केअर लॅबेने तयार केलेली यंत्रे महत्त्वाची भूमिका बजावतायत. मेकॅनिकल इंजिनिअर झालेले अजिंक्य धारिया, श्रीनिवास अधे, आसावरी काने आणि जेशा शहा यांनी हे स्टार्टअप सुरू केलंय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live