VIDEO | राऊत-फडणवीस यांच्य़ा भेटीमुळे चर्चांना उधाण

साम टीव्ही
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

ग्रँड हयातमध्ये दुपारच्या सुमारास ही बैठक झाली असून या चर्चेनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. दुपारच्या सुमारास या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. 

एक सर्वात मोठी राजकीय बातमी. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची गुप्त भेट झाल्याची सुत्रांची महिती आहे. दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. ग्रँड हयातमध्ये दुपारच्या सुमारास ही बैठक झाली असून या चर्चेनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. दुपारच्या सुमारास या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. 

पाहा यासंदर्भातील सविस्तर व्हि़डिओ-

राऊत-फडणवीसांच्या भेटीबाबत रावसाहेब दानवे काय म्हणाले पाहा व्हिडिओ-

 

 दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट ही गुप्त भेट नव्हती असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय. सामनाच्या मुलाखतीसाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीसांची भेट घेणं गैर आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. आज संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ग्रँड हयातमध्ये भेट झाली. या भेटीनंतर नव्या राजकीय गणितांबाबत चर्चांना उधाण आलं होतं. मात्र संजय राऊत यांनी आता याबाबत स्पष्टीकरण देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live