VIDEO | आपलं अपयश लपवण्यासाठी राज्य सरकारचा कांगावा-फडणवीस

साम टीव्ही
शनिवार, 2 मे 2020

इंटरनॅशनल फायनान्स कॅपिटल मुंबईबाहेर गेल्या प्रकरणी राज्य सरकारचा कांगावा म्हणजे आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

इंटरनॅशनल फायनान्स कॅपिटल मुंबईबाहेर गेल्या प्रकरणी राज्य सरकारचा कांगावा म्हणजे आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
मुंबई सुद्धा इंटरनॅशनल फायनान्स कॅपिटल म्हणून नावारुपाला येऊ शकते, इतरही अनेक देशांमध्ये अशा स्वरूपाची दोन दोन आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असल्याचंही ते म्हणालेत. ऐन महाराष्ट्र दिनी मुंबईचा हा प्रोजेक्ट मोदींच्या गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गुजरातमधील गांधीनगर हे IFSC प्राधिकरणाचं मुख्यालय असेल.

खरं तर या प्रकल्पासाठी सर्वार्थाने मुंबई हे शहरच योग्य असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला होता. मात्र तरीही मुंबईला डावलून पंतप्रधान मोदींच्या इच्छेनुसार हा निर्णय घेतला गेलाय. महाराष्ट्रातील भाजप सरकार गेल्यानंतर, वारंवार केंद्राकडून राज्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय. त्यावर फडणवीसांनी हा खुलासा केलाय.

पाहा देवेंद्र फडणवीसांनी सरकारबद्दल नेमकं काय म्हटलंय...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live