मोठी बातमी | देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का

फडणवीसांना धक्का
फडणवीसांना धक्का

नवी दिल्ली - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेली पुर्नविचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधात आता खटला चालवला जाणार आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 2 गुन्हे लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. यावर आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली. यावेळी सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना धक्का देत त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. 

याचिकाकर्त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. एक गुन्हा 4 मार्च 1996 रोजी आणि एक गुन्हा 9 जुलै 1998 रोजी दाखल करण्यात आला होता. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपविली. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऍड. उके यांची याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑक्‍टोबर रोजी उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत फडणवीस यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने 1 नोव्हेंबर रोजी हा खटला सारांश फौजदारी खटला म्हणून ठेवला जाईल, असे सांगत नोटीस बजावली होती.

devendra fadanvis suprime court petition crime affidavite maharashtra politics mumbai bjp Court Delhi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com