कृषी विधेयकासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे राज्य सरकारवर आरोप

साम टीव्ही
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020
  • 'कृषी विधेयकाची राज्यात अंमलबजावणी नाही'
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत
  • अंमलबजावणी न करणं हे शेतकरी विरोधी कृत्य

कृषी विधेयकावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने सामने आलेत. राज्य सरकारनं या विधेयकाला विरोध दर्शवलाय. केंद्राच्या कृषी विधेयकाची अंमलबजावणी करणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलीय.

तर राज्य सरकार जाणीवपूर्वक राजकारण करतंय असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कृषी विधेयकाची अंमलबजावणी न करणं हे शेतकरी विरोधी आहे. शेतकरीच त्यावर उत्तर देतील आणि राज्य सरकारला अंमलबजावणी करावीच लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय. 

पाहा देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर नेमके काय आरोप केलेत?


संबंधित बातम्या

Saam TV Live