धुळ्यातील एकविरा मातेच्या मंदिरामध्ये भाविकांनी जावळ काढण्यासाठी केली गर्दी..

भूषण अहिरे
सोमवार, 26 एप्रिल 2021

एकीकडे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी धुळे शहरातील खान्देश कुलस्वामिनी असलेल्या श्री एकवीरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त जावळ काढण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती

धुळे : एकीकडे कोरोना Corona बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने निर्बंध Restrictions अधिक कडक करण्यात आले आहेत. मात्र, असे असले तरी धुळे शहरातील खान्देशची कुलस्वामिनी असलेल्या श्री एकवीरा देवी Shri Ekvira Devi मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त जावळ काढण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. Devotees throng the Ekvira Mata temple in Dhule

यावेळी भाविकांकडून प्रशासनाच्या Administration नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. मंदिर परिसरात सोशल डिस्टंसिंगचा Social distance पूर्णपणे फज्जा उडाला असल्याचे चित्र पहायला मिळाले. नागरिकांनी मंदिरामध्ये गर्दी करताना आपले लहान बालक देखील त्या ठिकाणी जावळ काढण्यासाठी आणले असल्यामुळे लहान मुलांना देखील कोरोना Corona  होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच धुळ्यामध्ये Dhule दोन दिवसाच्या बालकाला देखील कोरोनाची लागण झाल्याचं निदर्शनास आलं होतं. असं असताना देखील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी लहान बालकांना नेल्यामुळे नागरिकांचा बेजबाबदारपणा यामध्ये समोर आला आहे. धुळ्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक Eruption झालेला असताना देखील नागरिकांनी अशा बेजबाबदारपणे वागल्याने धुळ्यात कोरोनाचा प्रादूर्भाव आणखीनच वाढण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. Devotees throng the Ekvira Mata temple in Dhule

तसेच मंदिर प्रशासनाच्यावतीने नागरिकांनी यात्रोउत्सवच्या दरम्यान, जावळ तसेच दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तरी मंदिर प्रशासनाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत नागरिकांनी जावळ तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं बघायला मिळाल.

Edited By- Digambar Jadhav

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live