गुढीपाडवा: श्री गजानन महाराजांचे मंदिर बंद असल्याने भाविकांनी टेकला प्रवेशद्वाराजवळ माथा

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी स्थळासमोर माथा टेकून केली जाते. मात्र कोरोना मुळे मंदिर बंद असल्याने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही भक्तांना मंदिराच्या प्रवेशद्वारावरच माथा टेकून दर्शन मिळणार आहे.

बुलढाणा: मराठी नव वर्षाची Marathi New Year सुरुवात अनेक जण विदर्भ पंढरी म्हणून मानल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज Shree Gajanan Maharaj यांच्या समाधी स्थळासमोर माथा टेकून करतात. यासाठी गुडीपाडव्याच्या Gudipadwa दिवशी लाखो भाविकांचा यात्रा याठिकाणी भरत असते. मात्र कोरोना Corona मुळे मंदिर बंद असल्याने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही भक्तांना मंदिराच्या प्रवेशद्वारावरच माथा टेकून दर्शन मिळत आहे. दर्शनाच्या वेळी अनेक भक्तांनी कोरोनाला हद्दपार करण्याचं साकडं गजानन महाराजांच्या चरणी घातले आहे.  Devotees took blessings near the entrance gate of Shree Gajanan Maharaj Mandir

हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी आज 13 एप्रिल ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.

पारंपरिक वेषभुषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. यंदा हे वर्ष मागच्या वर्षाप्रमाणे करोना विषाणूच्या कहरात अडकले असल्यामुळे या सणावरही कोरोनाचेच सावट आहे. Devotees took blessings near the entrance gate of Shree Gajanan Maharaj Mandir

तरीही नागरिकांनी मराठी वर्षाच्या या पहिल्या दिवशी मोकळ्या हवेत आणि प्रसन्न वातावरणात चराचरालासंजीवनी देणा-या सूर्याचं दर्शन घेतलं. सर्वांना ऊर्जा देणा-या सूर्याकडून यावेळी अमर्याद चैतन्य आणि आल्हादक प्रसन्नता लोकांनी टिपून घेतली नसेल तरच नवल. अश्यावेळी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भक्तांनी माथा टेकला.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live