विमानात लग्न करण्याची हौस पडली महागात; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 24 मे 2021

लोक वेगवेगळे मार्ग काढून लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. असाच एक काहीतरी  अतरंगी प्रकार तमिळनाडूच्या मदुरैमध्ये समोर आला होता. मदुरैच्या राकेश आणि दीक्षाने चक्क विमानामध्ये लग्न केले होते. असे असले तरी याप्रकरणी डीजीसीए (DGCA) कारवाई करण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : कोरोनाचा Corona वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन Lockdown लागू करण्यात आला आहे. यामुळे अनेक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. लोकांना लॉकडाऊनमध्ये लग्न समारंभ Wedding आयोजित करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोक वेगवेगळे मार्ग काढून लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. असाच एक काहीतरी अतरंगी प्रकार तमिळनाडूच्या मदुरैमधून समोर आला होता. मदुरैच्या Maidur राकेश आणि दीक्षाने चक्क विमानामध्ये Aeroplane लग्न केले होते. असे असले तरी याप्रकरणी डीजीसीए कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. DGCA orders action against wedding in aeroplane

तमिळनाडू Tamilnadu सरकारने कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 31 मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. असे असताना, मदुरै येथील गौरपीलयम येथे राहणाऱ्या एका लाकूड व्यावसायिकाचा मुलगा राकेश याचं लग्न एका उद्योगपतीच्या मुलीशी विमानात लावण्यात आले.  एका खासगी विमान कंपनीकडे लग्नसोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी दोन्ही कुटुंबाने विमान बुक केलं होतं. आणि हे विमान केवळ नातेवाईकांसाठीच बुक करण्यात आलं होतं.

हे देखील पहा -

विशेष म्हणजे जिथे लग्नसोहळ्याला, केवळ ५० माणसांची परवानगी आहे. तेथे चक्क १६१ वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रिपोर्टनुसार फ्लाईटने मदुरैमधून उड्डान केले होते. विमान दोन तास हवेत होते, याकाळात जोडप्याचे लग्न पार पडले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर Social Media व्हायरल झाले आहेत. DGCA orders action against wedding in aeroplane

सकाळी उठल्या उठल्या मोबाईल वापरता ? मग याचे परिणाम एकदा नक्की वाचा

डीजीसीएने तक्रार नोंदवण्याचे दिले निर्दश

एअरपोर्ट डायरेक्टरने म्हटलं आहे की, मदुरैतून एक स्पाईसजेट चार्टर्ड विमान बुक होते, लग्न समारंभाविषयी एअरपोर्ट ऍथोरिटीचे अधिकारी यांना काहीही माहिती नव्हती. दुसरीकडे, डीजीसीएने म्हटलं आहे की, याप्रकरणाचा तपास सुरु आहे आणि तसेच याबद्दल एअरलाईन आणि एअरपोर्ट ऍथोरिटीकडून रिपोर्ट मागण्यात आली आहे. एअरलाईने संबंधित अधिकाऱ्यांसह कोविड-19 नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live