धंनजय मुंडे रुग्णालयात आणि

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांना बुधवारी रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने चर्चगेट येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्या काही प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. त्यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर चर्चांना उधाण आल्यानंतर मुंडे यांच्या ऑफिसातून याबाबत ट्विटर वर खुलासा करण्यात आला आहे. काळजीचे कारण नाही असेही सांगण्यात आले आहे.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवार यांची नियुक्ती झाली. त्या कार्यक्रमानंतर घरी विश्रांती घेत असताना मुंडे यांच्या पोटात दुखू लागले.

पोटदुखी च्या त्रासाने तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे साहेब मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून धंनजय मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांची बहीण , विद्यमान भाजप मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे.

Web Title: Dhananjay Munde in Hospital Rumours on Social Media
 
संबंधित बातम्या

Saam TV Live