VIDEO | आरक्षणासाठी धनगर समाजाचं राज्यभरात "ढोल बजाओ, सरकार जगाओ" आंदोलन

साम टीव्ही
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढावा, धनगर समाजाला आदीवासी समाजाच्या योजनांचा लाभ मिळावा, समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी आणि मेंढपाळ सरक्षंण कायदा करावा आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या जात आहेत.

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं राज्यभरात ढोल बजाओ आंदोलन सुरू केलंय. सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरसमध्ये हे आंदोलन करण्यात आलंय. ढोलाच्या आवाजानं  चंद्रभागेचा तिर दुमदुमून गेलाय. भंडाऱ्याची उधळण करत  आंदोलक सहभागी झाले आहेत. येत्या काळात धनगर समाजाला न्याय नाही मिळाला तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा धनगर आंदोलकांनी दिला आहे. यावेळी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजीही करण्यात आली.

राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढावा, धनगर समाजाला आदीवासी समाजाच्या योजनांचा लाभ मिळावा, समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी आणि मेंढपाळ सरक्षंण कायदा करावा आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या जात आहेत.

पाहा या आंदोलनाचे राज्यभरातील व्हिडिओ -

आरक्षणासाठी धनगर समाजानं औरंगाबादमध्ये ढोल बजाव आंदोलन सुरू केलंय. राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी ढोल बजाओ आंदोलनाची हाक दिलीय. आज संपूर्ण राज्यभर हे आंदोलन केलं जातंय. राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश काढावा, धनगर समाजाला आदीवासी समाजाच्या योजनांचा लाभ मिळावा, समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी आणि मेंढपाळ सरक्षंण कायदा करावा आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या जातायत.

संबंधित बातम्या

Saam TV Live