धारावीचं अर्थचक्र कोलमडलं..चर्मोद्योगाला फटका...(पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
रविवार, 18 एप्रिल 2021

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे धारावीतील लहान-मोठे कारखाने ठप्प झाले आहेत. त्यामुळे धारावीचं अर्थचक्र मंदावले आहे

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने Maharashtra Government लागू केलेल्या निर्बंधांमुळे धारावीतील लहान-मोठे कारखाने ठप्प झाले आहेत. त्यामुळे धारावीचं अर्थचक्र मंदावले आहे. Dharavis economic cycle collapsed due to lock down and corona

मुंबईच्या Mumbai धारावीमधील Dharavi लहान-मोठे कारखाने ठप्प झाले त्यामुळे धारावीचं अर्थचक्र मंदावल आहे. अर्थचक्र कोलमडल्यामुळे ५०० कोटींचा उद्योगाला फटका बसला आहे. त्याला खीळ बसते हा प्रमुख उद्योग असलेला चर्म उद्योगाची Leather industry दर महिन्याला होणारी ५०० कोटींची उलाढाल थांबली आहे. तर कोरोनाच्या भीती पोटी  विविध उद्योगांमधील सुमारे ६० टक्के कामगार पुन्हा आपल्या मूळ गावी परतले आहेत. 

युरोपमध्ये Europe ज्या पद्धतीने जानेवारीच्या सुरुवातीलाच ज्या पद्धतीने कोरोना ने थैमान घालायला सुरुवात केली  त्याचप्रमाणे इथे सुद्धा ऑर्डर्स कॅन्सलेशनला सुरुवात झाली. आणि गेल्या जानेवारीपासून आर्थिक संकटात अडकलेला ९५ टक्के व्यवसाय आज बंद आहे. गेल्या पन्नास वर्षांमध्ये तेथील व्यापाऱ्यांना Traders कोणतीच आर्थिक मदत Financial Help पुरवली गेलेली नाही. ज्याने त्याने स्वतःच्या कर्तुत्वावर व्यापार उभा केलेला आहे. साधारणतः एक लाख ते दीड लोक लोक हे चर्मोद्योगाशी संबंधित आहेत. त्यातील अनेक जण कोरोनामुळे आपापल्या गावी परतले आहेत तर काही कसेबसे आपले पोट भागवत आहेत. Dharavis economic cycle collapsed due to lock down and corona

धारावीतील दाटीवाटीच्या झोपड्यांमध्ये फरसाण, रेडिमेड गारमेंट्स, चर्मोद्योग आणि आणि भंगार असे जवळपास पाच हजार लहानमोठे उदयॊग चालतात. त्यात सुमारे ५०००० असंघटित कामगार काम करतात. दर दिवशी धारावी मध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र कोरोनामुळे हे सर्व उद्योग ठप्प झाले आहेत.

आज परत कोरोना वाढतो आहे. लॉकडाऊन Lock Down मुळे घाबरून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. मागच्या वर्षी झाली तीच वाईट परिस्थिती पुन्हा होत आहे.  बंद पडलेले उद्योग सुरळीत करण्यासाठी पाच ते दहा वाजता पुन्हा मागे जावे लागणार आहे. अशी भीती वर्तवली जात आहे.  Dharavis economic cycle collapsed due to lock down and corona 

कामगार आपल्या आपल्या गावाकडे निघाले. त्यानंतर काही उद्योग गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन नंतर आताशी उभारी घेत असतानाच पुन्हा सरकारने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे धारावीतले उद्योग चक्र थांबले आहे. आता तरी सरकारने मदत करावी अशी मागणी हे छोटे उद्योजक करत आहेत.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live