धुळ्यात खुनाची थरकाप उडवणारी घटना उघडकीस

साम ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

धुळे परिसरात पुन्हा एकदा थरकाप उडवून देणारं हत्याकांड घडलं आहे. शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी काँग्रेस भवन समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे

धुळे - धुळे परिसरात पुन्हा एकदा थरकाप उडवून देणारं हत्याकांड घडलं आहे. शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी काँग्रेस (Congress) भवन समोर एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घुणपणे हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. Dhule City Shocked by Murder in Heart of City

ही घटना साधारणपणे रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.साधारण त्याचे वय ४० वर्ष असल्याचे दिसून येत आहे.

तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून मारेकर्‍यांनी घटनास्थळावरून पोबारा केला असून पहाटेच्या दरम्यान ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर धुळे शहर पोलिसांना (Police) या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी घटनास्थळावरील आजूबाजूला पडलेल्या काही वस्तूंच्या आधारे फिंगरप्रिंट(Fingerprint) एक्सपर्टच्या मदतीने मारेकऱ्यांचा तपास सुरू केला आहे. Dhule City Shocked by Murder in Heart of City

मृत पावलेल्या तरूणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून लवकरच या हत्येचा छडा पोलीस लावतील असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live