नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात धुळे पोलिसांचा कारवाईचा बडगा 

 Dhule police action against violators of rules
 Dhule police action against violators of rules

धुळे : धुळ्यात 101 दुकानदारांकडून 42 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ब्रेक द चेनचे Break The Chain उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानुसार 101 दुकानदार , आस्थापनांकडून 42 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध 158 केसेस करून 17 हजार 800 रुपये दंड वसूल केला. Dhule police action against violators of rules

धुळे Dhule शहर उपविभागातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवली असून जीवनावश्यक आस्थापना वगळता इतर आस्थापना वर, हॉटेलवर कारवाई करण्यात येऊन गुन्हे दाखल केले जात आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणारे , वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 219 वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई झाली करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

 
कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन केल्यानंतर देखील काही बेजबाबदार व्यापारी तसेच नागरिक हे विनाकारण रस्त्यावरती फिरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर अशा बेजबाबदार टवाळखोरांना आळा घालण्यासाठी ही धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. Dhule police action against violators of rules

पोलीस Police प्रशासनातर्फे  रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यां विरोधामध्ये कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्यामुळे विनाकारण रस्त्यावर टवाळक्या करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com