धुळ्यात पोलीस प्रशासनातर्फे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात

भूषण अहिरे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

लॉकडाउन घोषणा केल्यानंतर आज धुळे शहरामध्ये पोलीस प्रशासनातर्फे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

धुळे : राज्यात करोना Corona संसर्गाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. या आठवड्यात रुग्णसंख्येसह Patients आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन हादरलं आहे. त्यासोबतच सरकारी पातळीवर कोविड Covid नियमावली अधिक कठोर करण्यासाठी पावले टाकली जाऊ लागली आहेत. In Dhule police administration has deployed a large number of troops Streets 

त्यामुळे राज्यभरात पुन्हा कडक बंदोबस्त Bandobast लावण्यात आला आहे.  लॉकडाउन घोषणा केल्यानंतर आज धुळे शहरामध्ये पोलीस Police प्रशासनातर्फे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

रस्त्यावरती फिरणाऱ्या प्रत्येकास पोलिस अडवत असून करून घराबाहेर पडण्याचं कारण विचारलं जात आहे. नागरिकांनी पंधरा दिवसांच्या संचारबंदीला प्रतिसाद देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे धुळेकरांना Dhule करण्यात येत आहे. Dhule police administration has deployed a large number of troops Streets 

नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणं टाळत कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे देखील पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना सांगण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live