गायींची तस्करी धुळे पोलिसांनी रोखली

साम न्यूज ब्युरो
शनिवार, 27 मार्च 2021

गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न धुळे पोलिसांनी हाणून पाडला आहे. आझाद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित ट्रकमध्ये २३ गोवंश असल्याचे पोलिसांना आढळले. संबंधित ट्रकच्या क्रमांकावरून मालकाची माहिती काढली जात आहे.

धुळे : गोवंशाची तस्करी करण्याचा प्रयत्न धुळे (Dhule) पोलिसांनी हाणून पाडला आहे. आझाद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ही कारवाई केली असून संबंधित ट्रकमध्ये २३ गोवंश असल्याचे पोलिसांना आढळले. संबंधित ट्रकच्या क्रमांकावरून मालकाची माहिती काढली जात आहे. (Dhule Police Stopped Smuggling of Cattles)

आझाद नगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये कॉटन मार्केट परिसरामध्ये ट्रक मध्ये जवळपास 23 गोवंश जातीची जनावरं अवैधरित्या वाहून नेण्याचे काम सुरु आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती एका गुप्त सूत्रांमार्फत पोलिसांच्या हाती लागली. माहिती मिळताच पोलीस संबंधित ट्रकचा शोध घेण्यास त्वरित सुरुवात केली. शोध घेत असताना जनावरांना वाहून नेत असणारा ट्रक पोलिसांच्या निदर्शनास  आला दिसला. ट्रक दिसताच पोलीस ट्रकच्या दिशेने त्यांचा पाठलाग करू लागले. पोलीस आपल्या मार्गावर आहेत असे दिसताच संबंधित ट्रक मधील चालक व वाहक तेथून पसार झाले.

ट्रकमध्ये पोलिसांनी मागच्या बाजूस तपासणी केली असता त्यामध्ये जवळपास 23 गोवंश आढळून आले पोलिसांना आढळून आली. त्यापैकी एक जनावर हे मृत अवस्थेमध्ये पोलिसांना आढळून आले आहे. (Dhule Police Stopped Smuggling of Cattles)

यासंदर्भात आझादनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या ट्रकच्या नंबर वरून ट्रक मालकाचा तपास आझाद नगर पोलीस करीत आहे. ही जनावरं कुठून आणली जात होती व कशासाठी नेली जात होती याचा शोध आझादनगर पोलिस घेत आहेत. 

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live