हरवलेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी धुळे पोलिसांचा "ऑपरेशन मुस्कान" उपक्रम

dhule kidnapping.jpg
dhule kidnapping.jpg

धुळे - गेल्या काही महिन्यांपासून बालकांचे Chlid अपहरण व  बालकांच्या मिसिंगच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर धुळे Dhule पोलिसांनी  या हरवलेल्या व अपहरण Kidnapping झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी "ऑपरेशन मुस्कान" Operation muskan राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या मोहिमेअंतर्गत  एक पथक तैनात करण्यात आले असून  हे पथक शहरातील  भीक मागणाऱ्या त्याचबरोबर संशयास्पद रित्या फिरणाऱ्या बालकांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना सुपूर्द करण्याची कामगिरी या पथकाद्वारे केली जाणार आहे.

धुळे शहरातील हरवलेल्या तसेच अपहरण झालेल्या 18 वर्षांखालील मुलांचा शोध घेण्यासाठी धुळे पोलिसांनी 'ऑपरेशन मुस्कान 10' हाती घेतले आहे. धुळे शहरात रोज कुठे ना कुठे लहान बालके हरवल्याचे तसेच अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल होत असतात. शिवाय ठिकठिकाणी बालके भीक मागताना तसेच मजुरी करताना दिसून येतात. अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठविण्यासाठी धुळे पोलीस महिनाभर शहरात 'ऑपरेशन मुस्कान 10' राबवित आहेत. 

यासाठी पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. जर कुणाला लहान बालके भीक मागताना, बाल मजुरी करताना किंवा बेवारसपणे फिरताना आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हे देखील पहा -

सापडलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना घरी पाठवणार आहे, आणि बाकीच्या मुलांना अनाथ आश्रम येथे व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पथक प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी दिली असून धुळे पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच धुळे पोलिसांनी आतापर्यंत आठ बालकांना ताब्यात घेतले असून त्यांची संपूर्ण चौकशी पोलिसांकडून सुरू असून सुरू आहे. व त्यानंतर या बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती संबंधित पथक प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com