आता 1 मिनिटांत फुंकर मारुन कोरोना निदान करण्याचं तंत्रज्ञान विकसित, चाचणीचे परिणाम  90% अचूक असल्याचा दावा

साम टीव्ही
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

 

 • ऑर्गेनिक कंपाऊंडद्वारे कोरोनाचं निदान
 • चाचणीसाठी १ मिनिटापेक्षा कमी कालावधी
 • चाचणीचे परिणाम  ९० टक्के अचूक असल्याचा दावा
   

कोरोना व्हायरसच्या निदानासाठी आता नवी चाचणी विकसित करण्यात आलीय. फुंकर मारुन कोरोना निदान करण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय.

कोरोना व्हायरसच्या निदानासाठी नवनवीन चाचणी पद्धती विकसित केल्या जातायंत. आता सिंगापूरमधील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या टेस्टबाबत सर्वात जलद निकाल देणारं तंत्र विकसित केलंय. फुंकर मारून कोरोना व्हायरसची लागण झालीय की नाही, याबाबत माहिती मिळवता येणार आहे. या चाचणीची अचूनकता 90% असल्याचंही समजतंय.

या तंत्राच्या साहाय्याने श्वासांमध्ये असलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडद्वारे कोरोना व्हायरस आहे की नाही याबाबत माहिती घेतली जाईल. विशेष म्हणजे या चाचणीसाठी १ मिनिटापेक्षा कमी कालावधी लागणार आहे. या चाचणीचे परिणाम  हे ९० टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये हे टेस्ट किट तयार करण्यात आलंय. 180 रुग्णांवर आतापर्यंत या चाचणीचं परीक्षण करण्यात आलंय.

 

 • ऑर्गेनिक कंपाऊंडद्वारे कोरोनाचं निदान
 • चाचणीसाठी १ मिनिटापेक्षा कमी कालावधी
 • चाचणीचे परिणाम  ९० टक्के अचूक असल्याचा दावा
 • सिंगापूरमध्ये या टेस्ट किटची निर्मिती 
 • 180 रुग्णांवर आतापर्यंत या चाचणीचं परीक्षण
   
 • कोरोनाचं निदान जितक्या लवकर तितक्या जलदगतीनं उपचार शक्य होतात. सिंगापूरमध्ये तयार होणारे हे टेस्टिंग किट्स अवघ्या मिनिटभरात अचूक निकाल देतात. त्यामुळे या नव्या किट्समुळे कोरोनाशी लढाईत नक्कीच बळ मिळणार, हे निश्चित.


संबंधित बातम्या

Saam TV Live